बागायदारांना दोन्ही वादळांची भरपाई एकदम मिळावी : देवेंद्र फडणवीस

0

रत्नागिरी : कोकणातील आंबा बागायतदारांना गेल्या मागील वर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाची राहिलेली भरपाई आणि या वर्षीच्या तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई एकत्रितपणे देण्याची आग्रही मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी दिली. तौक्ते चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी फडणवीस कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. रायगड जिल्ह्यातून ते आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथे आले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. खेड तालुक्यातील बोरज येथे चक्रीवादळानंतर गेल्या सोमवारी एक दुर्घटना घडली. वादळामुळे तुटून पडलेल्या महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या तारेला स्पर्श होऊन घोसाळकर पती-पत्नीचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची फणडवीस यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, घोसाळकर कुटुंबाटा मुलगा आयटीआय झाला आहे. त्याच्या शिक्षणानुसार त्याला महावितरण कंपनीत नोकरी मिळावी, यासाठी मी सरकारशी पाठपुरावा करणार आहे. फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. प्रांत अधिकारी अवीशकुमार सोनोने यांनी बोरज अपघाताची आणि तालुक्यात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. यावेळी भाजपचे खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे, भूषण काणे, संजय बुटाला, विनोद चाळके, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांच्यासह बोरज गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
3:54 PM 20-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here