जिल्हा परिषद कामवाटप समितीची ‘व्हीसी’च्या माध्यमातून सभा

0

रत्नागिरी : जिल्हा परिषद रत्नागिरीचे काम वाटप समितीची सभा दि. २१ व २२ मे २०२१ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे. २१ मे २०२१ रोजी सकाळी ११ ते १२ वाजता मजूर सहकारी संस्था (पूर्ण जिल्हा) मजूर सहकारी संस्थांना कामाचे वाटप करणे. दुपारी १२ ते १ वाजता सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (विद्युत) (पूर्ण जिल्हा) साठी विद्युतीकरणाच्या कामाचे वाटप करणे. दुपारी १ ते कामांचे वाटप होईपर्यंत सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (स्थापत्य) रत्नागिरी बांधकाम विभागाकडील रत्नागिरी विभागांतर्गत सु. बे. अ. यांना कामाचे वाटप करण्यात येणार आहे. २२ मे २०२१ रोजी सकाळी ११ ते कामांचे वाटप होईपर्यंत सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (स्थापत्य) चिपळूण बांधकाम विभागाकडील चिपळूण विभागांतर्गत सु. बे. अ. यांना कामाचे या सभेमध्ये वाटप करण्यात येणार आहे, असे सदस्य सचिव काम वाटप समिती, जिल्हा परिषद रत्नागिरी तथा कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम विभाग, रत्नागिरी यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:20 AM 21-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here