मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने भारतीय नौदलाच्या गरजेनुसार एचएफएचएसडी (हाय फ्लॅश हाय स्पीड डिझेल) आयएन 512 हे नवे अद्ययावत इंधन विकसित केले आहे.यामुळे परदेशी नौदलांसोबतच्या सरावादरम्यान भारतीय नौदलाची क्षमता वाढणार आहे. या नव्या इंधनाच्या यशासोबतच जागतिक दर्जाची उत्पादने निर्माण करण्याची देशाची क्षमताही दिसून आली आहे. आगामी काळात भारतीय तटरक्षक दल आणि व्यापारी जहाजांनाही याचा फायदा होणार आहे.
