पुणे महसूल विभागात सुमारे ५ लाख पात्र शेतकरी

0

राज्य शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंत कर्जाची थकबाकी असणारे पुणे महसूल विभागात सुमारे ५ लाख पात्र शेतकरी आहेत. मात्र, त्यापैकी अंदाजे ६० हजार शेतक-यांकडे आधारकार्डच नसल्याने त्यांना या योजनेचा फायदा मिळण्याच्या दृष्टीने अडचण निर्माण झाली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे आधारकार्ड आहे त्यापैकी देखील हे कार्ड बँक खात्याशी लिंक नसलेल्या शेतकऱ्यांची संख्याही ४३ हजारच्या आसपास आहे त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेण्याच्या दिशेने प्रशासनाची कार्यवाही सुरु झाली आहे. येत्या १ एप्रिलपासून कर्ज माफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. आधार कार्डच नसलेले आणि कार्ड असूनही ते बँक खात्याशी लिंक नसलेले सर्वात जास्त पात्र शेतकरी सोलापूर जिल्ह्यात असल्याचंही स्पष्ट झाले आहे .

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here