शिवाजी महाराजांची तुलना करण्यायोग्य व्यक्ती भारतातच काय पण जगातही नाही – उदयनराजे भोसले

0

छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यायोग्य व्यक्ती भारतातच काय पण जगातही नाही असं वक्तव्य शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. त्याच बरोबर जगात फक्त एकच जाणता राजा आहे. जे लोक जाणता राजा म्हणून कुणालाही उपमा देतात त्याचा मी निषेध करतो असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं.शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या व्यक्तींचाही मी निषेध करतो. जेव्हा तुम्ही शिवसेना हे नाव ठेवलं तेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?

HTML tutorial

तुम्ही सर्व जण शिवाजी महाराजांची एक्सटेंडेट फॅमिली आहेत. शिवाजी महाराजांची कुणाशीही भेदभाव केला नाही. मी तुमच्यापेक्षा कणभर जास्त पुण्य केलं असेल म्हणून मी शिवाजी महाराजांच्या वंशात जन्मलो, असं उदयनराजे भोसले म्हणाले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. भाजपच्या दिल्ली कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनाला भाजप दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी उपस्थित होते.

याप्रकरणी शिवेंद्रराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अतिउत्साही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवर घाला अशी विनंती शिवेंद्रराजे यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना केली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. पक्षात काही अतिउत्साही कार्यकर्ते आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे पक्ष नेतृत्वावर चिखलफेक केली जाते. त्यामुळे त्यांना आवर घालण्याची गरज आहे.” असं शिवेंद्रराजे म्हणाले.

“माझी अमिताभशी तुलना केली तर चालेल का? मोदी साहेबांनी स्वत:ला आरशात पाहायला हवं होतं. आपली तुलना शिवाजी महाराजांशी होते आहे हे पाहायला हवं होतं,” अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

“आज मोदीभक्तांनी कहरच केला. बेशरमपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. शिवाजी महाराज हे एकमेव अद्वितीय असं रसायन होतं, ते जगाच्या अंतापर्यंत परत निर्माण होऊ शकणार नाही,” अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here