सध्या रूपेरी पडद्यावर ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपट दमदार कमाई करताना दिसत आहे. १० जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तर आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने ‘तान्हाजी’ चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. त्यामुळे अभिनेता अजय कुमार स्टारर ‘तान्हाजी’ चित्रपट येत्या काळात दमदार कमाई करेल यात काही शंका नाही.
