कार्यालयांनी केवळ कर्मचाऱ्यांनाच लस द्यावी, त्यांच्या कुटुंबीयांना नको; सरकारचे स्पष्ट निर्देश

0

नवी दिल्ली : सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांचंच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांचं आणि त्यांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता केंद्र सरकारनं पुन्हा एक मोठा निर्णय घेतला आहे. कामाच्या ठिकाणी केवळ कर्मचाऱ्यांचंच लसीकरण करता येणार असून त्यांच्या कुटुंबीयांना आता लस मिळणार नाही. कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण करता येणार नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं राज्य सरकारांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनंतर अनेक कंपन्या आणि उद्योग संस्था संभाव्य आढावा घेण्यासाठी सरकारकडे हा मुद्दा उपस्थित करत आहेत. हे पत्र ४५ वर्षे वयाच्या पुढील कर्मचार्‍यांपुरतीच मर्यादित आहे असा संदर्भ असला तरी उद्योग मंडळं तसंच कॉर्पोरेट संस्थांनी या नियमांबद्दल आपल्याला कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. याशिवाय या पत्रात काही मार्गदर्शक सूचनांमध्ये बदलांचाही उल्लेख आहे, जे यापूर्वी स्पष्टपणे संकेतस्थळावर उपलब्ध नव्हते. यामुळेच काही कंपन्यांची सरकारकडे यासंदर्भात स्पष्टता आणण्याची मागणी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:59 PM 22-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here