#INDvAUS : .तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करीन – कोहली

0

भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिली लढत आज मुबंईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. संघात तीन सलामीवीर फलंदाज आहेत. त्यामुळे संघनिवडीवर काथ्याकूट करावा लागणार असला तरी वेळ पडली तर मी माझा फलंदाजीचा क्रम बदलीन, असे कोहलीने म्हटले आहे.रोहित शर्मा, लोकेश राहुल व शिखर धवन हे तिघेही फाॅर्ममध्ये आहेत, त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले आहे.पुढे बोलताना तो म्हणाला, जर सलामीला फलंदाजी करणारे हे तिघेही फलंदाज फाॅर्मात (भरात) आहेत, तर त्यांचाच समावेश केला पाहिजे त्यामुळे संघालाच लाभ होईल. मग त्याच्यासाठी मला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे लागले तरी हरकत नाही, असे देखील कोहलीने सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here