मी नाहक कोणाला त्रास देणार नाही, कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही.आम्हाला कोणी त्रास दिला तर गप्प बसणार नाही , त्यामुळे अंगावर कोणी येऊ नये, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला.जिल्ह्यच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सामंत यांनी गेल्या १२—१३ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यचा झंझावाती दौरा केला. या वेळी खारेपाटण, वैभववाडी, कणकवली, मालवण इत्यादी ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.तसेच कार्यकर्त्यांचे मेळावेही झाले. मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे इत्यादी पदाधिकारी या दौऱ्यात उपस्थित होते. कार्यकर्त्यांंच्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्र्यांनी भाजपा खासदार नारायण राणे यांच्या नामोल्लेख टाळला.
