जनकल्याण समिती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने कोविड सेंटरला ५ इलेक्ट्रिक गिझरची भेट

0

राजापूर : तालुक्यातील धारतळे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरसाठी रा.स्व.संघ जनकल्याण समिती दक्षिण रत्नागिरीच्या वतीने पाच इलेक्ट्रिक गिझर भेट देण्यात आले. राजापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निखिल परांजपे यांच्याकडे हे गिझर सुपूर्द करण्यात आले. यावेळी जनकल्याण समिती जिल्हा दक्षिण रत्नागिरी शिक्षण आयाम प्रमुख राजन गोठणकर, रा. स्व. संघ राजापूर तालुका संपर्क प्रमुख संदीप देशपांडे, राष्ट्रीय सेवा समिती दक्षिण रत्नागिरी कोषाध्यक्ष ऍड.प्रशांत पाध्ये,जनकल्याण समिती रुग्णोपयोगी साहित्य केंद्र राजापूर प्रकल्प प्रमुख रमेश गुणे यांच्यासह जनकल्याण समितीचे अनंत रानडे, विशाल मोरे,संघ स्वयंसेवक सुशांत पवार,सुरज पेडणेकर,विवेक गुण्ये, प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून दीपाली पंडित, कर्मचारी सुशांत बाकाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:03 PM 24-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here