विधान परिषद : धनंजय मुंडे यांच्या जागेवर काँग्रेसच्या संजय दौंड यांना संधी

0

राज्याचे समाजकल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली आहे. या जागेवर कुणाला संधी दिली जाणार, याविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवर काँग्रेसच्या संजय दौंड यांना संधी दिली आहे. या जागेसाठी २४ जानेवारी रोजी मतदान होणार आहे.विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. सध्या धनंजय मुंडे हे राज्याचे समाज कल्याण मंत्री आहेत. धनंजय मुंडे हे विधानसभेत गेल्यानं त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी भाजपानं राजन तेली यांना अगोदरच उमेदवारी दिली आहे.

HTML tutorial

दोन नावांची होती चर्चा –

धनंजय मुंडे यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली. सुरूवातीला या जागेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. पुढे या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर दोन नावे चर्चेत होती. यात राष्ट्रवादी कुणाला संधी देणार याकडे सगळ्याचं लक्ष होतं. राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे आणि काँग्रेसचे संजय दौंड यांची नावे स्पर्धेत होती. त्यात संजय दौंड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here