मंडणगड आगारातून बोरिवली, नालासोपाऱ्यासाठी बससेवा

0

रत्नागिरी : मंडणगड एसटी आगारामार्फत कोरोनाच्या आरोग्यविषयक सर्व नियमावलींचे पालन करून सोमवार, २४ मे पासून बोरिवली (मुंबई) आणि नालासोपारा मार्गावर बससेवा सुरू होत आहे. मंडणगड-बोरिवली बस सकाळी ८.३० वाजता सुटेल आणि परतीच्या प्रवासासाठी ती बोरिवलीहून सकाळी सव्वासहा वाजता सुटेल. मंडणगड तिडे नालासोपारा मार्गावरील बस रोज दुपारी दीड वाजता सुटेल. नालासोपाऱ्याहून ती रोज सकाळी साडेसहा वाजता सुटणार आहे. या दोन्ही गाड्या मुंबईकडे जाताना पनवेलपासून पुढे सर्व एसटी थांब्यावर थांबणार आहेत. परतीच्या प्रवासात महाडपासून पुढे लांब पल्ल्याच्या सर्व थांब्यावर थांबणार आहेत. अत्यावश्यक सेवेमधील आणि गरजू प्रवाशांनी या फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीमार्फत करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:38 PM 24-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here