ओझरे खुर्दमध्ये बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला

0

देवरूख : नजीकच्या ओझरेखुर्द-देवरूख सीमेवर शनिवारी रात्री बिबट्याने घराजवळ प्रवेश केला. बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. कुत्रा ओरडताच घरातून लाईट लावण्यात आला. त्यामुळे बिबट्या पळून गेला आणि पुढील अनर्थ टळला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. शैलेश जागुष्टे यांच्या अंगणात रात्री दीडच्या सुमारास हा बिबट्याने प्रवेश केला. बिबट्याची भर वस्तीत वर्दळ सुरू झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:19 PM 24-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here