उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी चेन्नई येथील निवासस्थानी कुटुंबातील सदस्यांसोबत भोगी सण साजरा केला. ट्विटर द्वारे माहिती देताना नायडू म्हणाले, ” परिवारातील सदस्यांसोबत सकाळी भोगी सण साजरा. या दिवशी होळीची पूजा केली जाते. जुने तसेच वाईट विचार सोडून नवीन संकलप करण्याचा हा सण आहे . हा नवीन सूर्यप्रकाश आपण सर्वांचे जीवन प्रकाशमान करोत. भोगी.. पोंगल आणि संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. “भोगी सण प्रामुख्याने आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात साजरा केला जातो. तीन दिवसांच्या संक्रती उत्सवाला भोगी पासून सुरवात होते. तेलुगू राज्यात संक्रातीचे फार महत्व आहे. यास ‘पेद्दा पंडगा ‘ देखील संबोधले जाते. जगभरातील तेलुगू बांधव हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
