राजापूर : कोरोना संकट काळात राजापूरकरांना गेले वर्षभर प्रतीक्षा लागून राहिलेल्या राजापुरातील ओणी व रायपाटण येथील शासकीय कोव्हिड रुग्णालयांचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध झाल्यास पुढील आठवड्यात या दोन्ही ठिकाणी ही कोव्हिड रुग्णालये रुग्णांसाठी सुरू होणार आहेत. बुधवार २६ मे पर्यंत ही दोन्ही रुग्णालये सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार राजन साळवी यांनी पत्रकारांना सांगितले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:13 AM 25-May-21