सेट परीक्षेसाठी 27 हजार अर्ज

0

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत सहायक प्राध्यापक पदांसाठी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेसाठी (सेट) आतापर्यंत 27 हजार 280 उमेदवारांनी अर्ज केले असून, अर्ज करण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी असून, विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करावे, असे आवाहन विद्यापीठाच्या सेट विभागाने केले आहे. विद्यापीठाच्या सेट विभागामार्फत यंदा सेट परीक्षा 28 जून रोजी होणार आहे. ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा या केंद्रांवर होणार आहे. या परीक्षेसाठी आतापर्यंत 27 हजार 280 उमेदवारांनी अर्ज केले असून, त्यातील 19 हजार 885 जणांनी शुल्क भरले आहे. मागील परीक्षेच्या वेळी लाखांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते. याही परीक्षेसाठी शेवटच्या टप्प्यात अर्ज करण्याची शक्‍यता आहे. ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी संवर्गाचा अचूक उल्लेख करावा. तसेच, क्रिमिलिअर प्रमाणपत्र असेल, तर त्याच आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. दरम्यान, उमेदवार सेट परीक्षेत पात्र ठरला असला तरी त्याच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केल्यानंतर त्यांना उत्तीर्णाचे प्रमाणपत्र दिले जाइल, याकडे सेट विभागाचे समन्वयक डॉ. बी. पी. कापडणीस यांनी लक्ष वेधले.

ई-प्रमाणपत्र
मागील सेट परीक्षेत 5 हजार 415 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 4 हजार 624 उमेदवारांनी संकेतस्थळावरून ई-प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. सेट परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी प्रत्यक्षपणे सेट विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाणार नाही. पात्र उमेदवारांना ऑनलाइन प्रमाणपत्र हेच अधिकृत राहील, अशी माहिती कापडणीस यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here