पंतप्रधान मोदी यांनी दिल्या उत्तरायण पर्वाच्या शुभेच्छा

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरात तसेच देशातील इतर नागरिकांना ‘उत्तरायणच्या ‘ शुभेच्छा दिल्या. गुजराती आणि इंग्रजी भाषेत ट्विटर संदेशाद्वारे मोदी म्हणाले, ” उत्तरायण पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. गुजरातचे आकाश रंगेबिरंगी पतंगांनी भरून गेलेआहे.सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. हे उत्सवाचे पर्व नागरिकांच्या जीवनात प्रगती, शांती, समृद्धी आणि अधिकाधिक विकासाच्या संधी निर्माण करोत. ” याचप्रमाणे, केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सुद्धा ‘उत्तरायणच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here