चक्रीवादळग्रस्तांसाठी भाजपची ‘द फिफ्थ पिलर’ संकल्पना

0

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळात अनेकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना भरपाई मिळण्याची शक्यता नसल्याचे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेऊन ‘द फिफ्थ पिलर’ नावाची संकल्पना राबविली आहे. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर नुकसान झालेल्या कोणाही बागायतदाराला, मत्स्य व्यावसायिकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या नुकसानीविषयीची छायाचित्रे आणि व्हिडीओ सादर करता येऊ शकतील. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाचे सोमवारी ऑनलाइन उद्घाटन केले. चक्रीवादळामुळे नुकसान झालेली कोणतीही व्यक्ती भरपाईपासून वंचित राहू नये, यासाठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आल्याची माहिती या उपक्रमाचे सहसंयोजक समीर गुरव यांनी दिली. आपद्ग्रस्तांनी ७३०४५०६९९९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपल्या नुकसानीची छायाचित्रे, व्हिडीओ, निवेदने अपलोड करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:48 PM 25-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here