पंजाबमधील फिरोझपूर जिल्ह्यात पाकिस्तानी ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मंगळवारी पाडले. शामेके ठाण्याजवळील तेंडीवाला गावात हे ड्रोन दिसले. त्यानंतर त्यावर गोळीबार करून ते पाडण्यात आले, असे सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना हे ड्रोन दोनदा दिसले त्यामुळे ते पाडण्यात आले. दरम्यान, काश्मिरमधून कलम 370 रद्द केल्यानमतर पहिल्या काही महिन्यात पाकिस्तानी सीमेपलीकडून भारतीय भूमित आलेली 10 ते 15 ड्रोन दररोज पहायला िंमळत असत. मात्र आता ते प्रमाण घटून जम्मू आणि पंजाब सीमेवर एक ते दोन ड्रोनवर आले आहे, अशी माहिती लष्कराच्या सुत्रांनी दिली. हा टेहळणीचा प्रकार असावा असा संशय आहे.
सीमावर्ती भागात सीमा सुरक्षा दल, पोलिस आणि अन्य दलांना पाच ऑगस्ट ते ऑक्टोबर 2019 पर्यंत दररोज 10 ते 15 ड्रोन दिसत असत. असे ड्रोन दिसल्यास त्यांना तातडीने पाडण्याचे आदेश सीमा सुरक्षा दलांना आणि पोलिसांना देण्यात आले होते. मात्र, अशी ड्रोन पाडण्यासाठी काही विशिष्ट यंत्रणा आणि प्रशिक्षण लागते. ते या दलांकडे नाही, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.ज्या ज्या वेळी हे ड्रोन टापूत येतील, त्या त्या वेळी ती पाडा. त्याच्यावर नेम धरा आणि आणि ती उडवा, असे आदेश देण्यात आले आहेत. गुजरातच्या सीमावर्ती भागातही काही ड्रोन दिसले आहेत.
तीन प्रकारचे ड्रोन असतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे जमीनीवरून नियंत्रित केले जाणारे ड्रोन, दुसरा प्रकार म्हणजे जीपीएस बसवलेले ड्रोन आणि तिसरा म्हणजे अधिच माहिती भरून ठेवलेला अद्ययावत ड्रोन. तिसऱ्या प्रकारातील ड्रोन पाडणे अवघड असते.बीएसएफनी आतापर्यंत पाडलेल्या ड्रोनपैकी बहुतांश टेहळणी करणारे होते. तर काही अंमली पदार्थांची तस्करी करणारे होते.
