भावी शिक्षकांना आता ‘टीईटी’ परीक्षेचे वेध

0

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यावर्षी 19 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे, सर्वच भावी शिक्षक सध्या टीईटीच्या परीक्षेचा अभ्यास करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. सध्या या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी टीईटीची परीक्षा दि. 19 जानेवारी होत आहे. या परीक्षेसाठी पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. काही तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास परीक्षार्थीने अर्ज सादर केल्याचे तसेच निश्‍चित कालावधीमध्ये परीक्षा शुल्क भरल्याबाबतच्या पुराव्यासह परीक्षा परिषदेच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित किंवा विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक किंवा शिक्षकपदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा उतीर्ण होणे शिक्षकांना अनिवार्य आहे. त्यामुळे, या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करण्यात आले आहेत. आलेल्या अर्जांनुसार परीक्षा मंडळानेही परीक्षेची तयारी केली असून रविवार दि. 19 जानेवारी रोजी विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेसाठी दि. 21 डिसेंबर 2019 पासून या परीक्षेचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना या प्रवेशपत्राची प्रिंट काढून घेता येणार आहे. पहिला पेपर 19 जानेवारी रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1, तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 4.30 या वेळेत होणार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here