कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा खो-खो संघटनेचा निर्णय

0

रत्नागिरी : कोरोनाग्रस्त राष्ट्रीय खो-खो खेळाडूंना महाराष्ट्र खो-खो संघटनेमार्फत आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने माहिती संघटनेकडे पाठविण्याचे आवाहन राज्य संघटनेचे सचिव अ‍ॅड. गोविंद शर्मा यांनी केले आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोनाग्रस्त गरीब होतकरू खेळाडूंना आर्थिक मदत करण्याची भूमिका घेतली आहे. भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी खेळाडूंच्या आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव अ‍ॅॅड. गोविंद शर्मा यांनी राष्ट्रीय पातळीवर खेळलेले खो-खो खेळाडू जर कोरोनाबाधित असतील, अशा गरीब खेळाडूंची माहिती राज्य संघटनेकडे व्हॉट्सअप किंवा ईमेलद्वारे पाठवावी, असे पत्र जिल्हा सचिवांना पाठविण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:21 PM 26-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here