”मातोश्रीमध्ये भुताटकी, तिथे शांतीतज्ञ करा”

0

मुंबई : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करतानाच राज्यातील विविध प्रश्नांवरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत नेहमी राज्यपाल आणि पंतप्रधानांवर टीका करतात. ही पदे घटनात्मक आहेत. त्यांचा सातत्याने अपमान केला जातो. आधी सरकारच्या झालेल्या कामांची प्रतिक्रिया घ्या. कुणाला हनुमान बनवायचं आणि कुणाला गणपती करायचं हे तुम्ही करता, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यात जर कुठे भुताटकी असेल तर ती मंत्रालय, वर्षा आणि मातोश्रीवर आहे. तेथे शांती करा. मन शांती करा, असं सांगतानाच संजय राऊतांची भाषा ही योग्य नाही. राज्यकर्त्यांना शोभणारी ही भाषा नाही, असंही ते म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:56 PM 26-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here