गायब आमदार प्रताप सरनाईक यांचा शोध घ्या, भाजप शिष्टमंडळाचं पोलीस आयुक्तांना साकडं

0

ठाणे : ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक गायब असून त्यांचा शोध घ्या, असं साकडं घालत भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि अधिकृत तक्रार नोंदवली आहे. “तीन विविध घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेले दोन महिने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गायब आहेत. काय झालं, कोणी किडनॅप केलं, याची भीती मतदारांना वाटत आहे. तेव्हा, त्यांना शोधण्यासाठी कार्यवाही करावी,” असं म्हणत काल भाजपा नेते किरीट सोमय्या, ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदर संजय केळकर आणि भाजप गटनेते मनोहर डुंबरे आदीच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची भेट घेतली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:27 AM 27-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here