कोरोनामुळे मृत्यू होईल या भीतीमुळे अंतरिम जामीन अशक्य : सर्वोच्च न्यायालय

0

नवी दिल्ली : कोरोनामुळे मृत्यू होण्याची भीती लक्षात घेऊन अलाहबाद उच्च न्यायालयाने प्रतिक जैन याला जानेवारी 2022 पर्यंत जामीन मंजूर केला होता. परंतु, कोरोनामुळे मृत्यू होईल या भीतीच्या आधारे अंतरिम जामीन देता येणार नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने अलाहबाद हायकोर्टाचा निर्णय रद्द केलाय.काही दिवसांपूर्वी अलाहबाद हायकोर्टात झालेल्या सुनावणीत तब्बल 130 हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या प्रतीक जैन याला जानेवारी 2022 पर्यंत जामीन मंजूर केला होता. बाधितांची वाढती संख्या पाहता एखाद्या आरोपीला तुरुंगात पाठवणे योग्य ठरणार नाही. यात त्याच्या जिवाला धोका आहे, असे उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते. यानंतर उत्तरप्रदेश सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. संसर्गाचा वाढता धोका पाहता उच्च न्यायालयाने आरोपीला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. इतर प्रकरणांसाठी मात्र हे उदाहरण चुकीचे उदाहरण ठरेल. यामुळे हा आदेश रद्दबातल करावा, अशी मागणी उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्या. विनीत सरन आणि न्या. भूषण गवई यांच्या न्यायासनाकडे केली. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त टिप्पणी करत हायकोर्टाचा निर्णय रद्दबातल केलाय.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:28 PM 27-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here