मराठा आरक्षण : संभाजीराजेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

0

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी खासदार संभाजीराजे हे सध्या महाराष्ट्राचा दौरा करत सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. आज सकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यावर आता खासदार संभाजीराजे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी ही भेट झाली. जवळपास एक तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. विविध विषयांवर या भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. मराठा समाजाला न्याय मिळावा, मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आहे असं वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:30 PM 27-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here