रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन कडून सिव्हिल हॉस्पिटल ला वॉटर डिस्पेन्सर भेट

0

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन या सामाजिक संस्थेतर्फे सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीमधील रुग्णांच्या सेवेकरिता वॉटर डिस्पेन्सर भेट देण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या कोव्हीड रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांची संख्या खूप वाढली आहे त्यांच्यासाठी गरम व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी पडत आहे. सामाजिक भानाची जाणीव ठेवून रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन चे सभासदांनी व्होल्टास कंपनी चा वॉटर डिस्पेन्सर सिव्हिल सर्जन डॉ संघमित्रा फुले मॅडम यांचेकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेमध्ये कायम कार्यरत असणारे श्री.सागर भिंगारे यांचे उपस्थित सुपूर्द केला. सिव्हिल सर्जन डॉ. फुले मॅडम यांनी या यंत्राचा सिव्हिल हॉस्पिटल च्या रुग्ण सेवेकरिता स्वीकार केला व रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनप्रति आभार व्यक्त केले. कोव्हीड पॅनडामिक मधील सामाजिक बांधिलकी चे भान ठेवून याच क्लब तर्फे गरजु कुटुंबाना ग्रोसरी किटचे देखील वाटप करणेत आले. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या या दोन्ही उपक्रमाकरीता क्लबचे अध्यक्ष श्री.प्रसाद खेडेकर, रोटरी रत्नागिरी विभागाचे असिस्टंट गव्हर्नर श्री.समीर इंदुलकर तसेच क्लब सदस्य श्री.बिपीनचंद्र गांधी, श्री.जयंतीलाल जैन, श्री.राजेंद्र उर्फ दादा कदम, श्री.दिगंबर मगदूम, श्री.संजय पतंगे, सौ.शाल्मली आंबूलकर व श्री.विनय आंबूलकर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:51 PM 27-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here