धारतळे कोरोना केअर सेंटरसाठी एक लाखाची मदत सुपूर्द

0

राजापूर : कोरोना संकट काळात आपलाही खारीचा वाटा या भावनेतून कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूरच्या वतीने गोळा केला एक लाख रुपयांचा मदतनिधी धारतळे कोव्हिड सेंटरच्या उभारणीसाठी देण्यात आला. कोव्हिड सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी खा.विनायक राऊत तसेच तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोव्हिड सेंटरच्या अत्यावश्यक आरोग्य वस्तूंकरिता संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बावकर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द केला. देणगी दिलेल्या सर्व देणगीदारांचे व कोव्हिड सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संबंधितांना शाखेच्या वतीने धन्यवाद दिले. याप्रसंगी जि. प. सदस्य दीपक नागले, सुरेश बाईत, सहसचिव श्रीकांत राघव, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:07 PM 28-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here