बेपत्ता महिलेचा आढळला विहिरीत मृतदेह

0

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद-खंडाळा येथून दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह घराच्या विहिरीत आढळला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्याने उघडकीला आली. रुक्मिणी लक्ष्मण वाळके (३८, मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. वाटद-खंडाळा) असे बुडून मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मात्र, तिने आत्महत्या केली की अन्य काही कारण आहे, याचा शाेध पाेलीस घेत आहेत.याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिचे पती लक्ष्मण हाेनाप्पा वाळके यांनी पाेलीस स्थानकात याविषयीची फिर्याद दिली़. या फिर्यादीनुसार २५ मे रोजी सकाळी ५.३० वाजल्यापासून त्यांची पत्नी घरातून निघून गेली होती. त्यांनी खंडाळा आणि इतर नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, पत्नीचा काेठेही शाेध न लागल्याने त्यांनी जयगड पोलीस स्थानकात बेपत्ता म्हणून फिर्याद दिली हाेती. लक्ष्मण वाळके हे गुरूवारी सायंकाळी घराजवळील विहिरीजवळ गेले असता, त्यांना विहिरीत पत्नीचा मृतदेह दिसला. त्यांनी पाेलिसांना माहिती देताच पाेलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार जाधव करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:56 AM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here