”…मग राजेश टोपेसहित अजित पवारला रस्त्यावर उतरावं लागेल”

0

मुंबई : मराठा आरक्षण संदर्भात सगळं सुरळीत चाललेलं आहे. तुम्ही त्याला काही वेगळं वळण देऊ नका. संभाजी राजे यांनी ६ जून पर्यंतची मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी मुदत दिली आहे. पण, या तारखेला अद्यापही ९ दिवस अवकाश आहे. यादरम्यान नक्कीच चांगला निर्णय घेता येईल. मात्र, मराठा आरक्षणावरून काहींना त्यात राजकारणच करायचे आहे, संभाजीराजेंना नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्या रस्त्यावर उतरण्याच्या विधानावरुन त्यांना टोलाही लगावला. खासदार संभाजीराजे यांनी सरकारला 6 जूनपर्यंतचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांवर 6 जूनपर्यंत निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराच संभाजीराजेंनी दिला. त्यानंतर, अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारची भूमिका स्पष्ट केली. माझी आणि संभाजीराजेंची भेट दारातच झाली. आम्ही एकमेकांना फक्त नमस्कार केला. पण राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी पुढाकार घेऊन दिलीप भोसले जे अलाहाबाद हाय कोर्टाचे चीफ जस्टीस आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ते आता यावर काम करत असल्याची माहिती दिली. तसेच, चंद्रकांत पाटील यांना टोलाही लगावला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असे म्हटलंय. त्या प्रश्नावर अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. आता दादांचं ऐकायलाच पाहिजे. मग, राजेश टोपेसहित अजित पवारलाही रस्त्यावर उतरावं लागेल, कारण आम्हीपण मराठा समाजात मोडतो. मी, राजेश टोपे आम्ही सगळे मराठा समाजातले आहोत, आम्हाला पण आता रस्त्यावर उतरायला पाहिजे, असा टोमणा मारला. तसेच, कारण नसताना काहीजण, संभाजीराजे नव्हे, काहीजण… कारण नसताना आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असं म्हणतात. पण कसलं आंदोलन, आणि कशासाठी पाठिंबा? अशा शब्दात अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंब्याबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here