एक्प्रेससाठी वापरलेले डबे लवकरात लवकर परत द्या, अशी मागणी हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे केली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-कश्मीरातील कलम 370 रद्द झाल्यानंतर दोन देशांमधील तणाव वाढला. परिणामी, समझौता एक्प्रेसची सेवा खंडित झाली आहे. तेव्हापासून वाघा बॉर्डरवर या एक्प्रेसचे डबे पडून आहेत.
कलम 370 हद्दपार झाल्यामुळे दुखावलेल्या पाकिस्तानने 8 ऑगस्ट 2019 रोजी समझौता एक्प्रेसची फेरी वाघा बॉर्डरवरच रद्द केली. त्यामुळे हिंदुस्थानला येणाऱया 117 प्रवाशांचा अर्ध्यावरच खोळंबा झाला होता. हिंदुस्थानच्या रेल्वे प्रशासनाने वाघा बॉर्डरवर खोळंबलेल्या प्रवाशांना आणण्यासाठी आपले इंजिन, मोटरमन आणि सुरक्षा कर्मचारी पाठवले. त्यानंतर वाघा बॉर्डरवरील प्रवासी सायंकाळी 5.15 च्या सुमारास अटारी बॉर्डरवर पोहोचले. तेव्हापासून गेले पाच महिने समझौता एक्प्रेसचे डबे वाघा बॉर्डरवर पडून आहेत. समझौता एक्प्रेससाठी जानेवारी ते जून या अवधीत पाकिस्तानचे, तर जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांत हिंदुस्थानचे डबे वापरले जातात.
