“आता कळला ना परबांनू, आम्ही काय बोलत होतव ते”

0

मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि काही परिवहन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारी तब्बल तक्रार परिवहन विभागातील एका निलंबित अधिकाऱ्याने नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली असून तेथील पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) यांना दिले आहेत. नाशिक येथे मोटार वाहन निरिक्षक असलेले गजेंद्र तानाजी पाटील यांनी १६ मे रोजी ही तक्रार पंचवटी पोलीस ठाण्यात दिली. त्यावर पोलीस आयुक्त पांडेय यांनी पाच दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश २७ मे रोजी दिले. तक्रारकर्ते पाटील हे चौकशीसाठी सहकार्य करीत नसले तरी तक्रारीतील मजकूर पाहता त्यात अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तक्रारीकडे दुर्लक्ष करणे न्यायोचित होणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाल्यानंतर भाजपाने पुन्हा महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे कोकणी भाषेत अनिल परब यांना अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावला आहे.

नितेश राणे म्हणाले की, आमचे हरकुळचे परब.. गेले त्यांच्या कलानगरच्या सायबाकडे!!

सायबाक सांगितल्यानी.. “सोमय्यांपासून माका वाचवा”

मात्र सायबाण उत्तर दिल्यान.. “तू तुझा बघून घे” !!

आता कळला ना परबांनू..आम्ही काय बोलत होतव ते !!

तुमचा स्वागत आसा…!

असा टोला त्यांनी लगावला आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:33 PM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here