“…नाहीतर मी राजकारणात येणारच नव्हते” : पंकजा मुंडे

0

मुंबई : राज्याच्या राजकारणात अनेक वाद हे सर्वश्रुत आहेत. यातीलच एक वाद म्हणजे मुंडे भावा-बहिणीमधला वाद. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यातील वादविवाद सगळ्यांना माहिती आहेच. मात्र, या वादावादीत त्यांना एकमेकांची काळजी असल्याचंही अनेकदा दिसून आलं आहे. जेव्हा पंकजा मुंडे कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समजलं, तेव्हा धनंजय मुंडेंनी ट्वीट करून काळजी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काही जणांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशा अनेक बाबी आहेतच. मात्र, आता पंकजा मुंडेंनी आपण मुळात राजकारणात का आलो, याचा खुलासा केला आहे. आणि त्याचं कारण चक्क त्यांनी ‘धनंजय मुंडे’ आहेत असं सांगितलं आहे. लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी आपली भूमिका मांडली आहे.

‘धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हतं, म्हणून मी राजकारणात आलेे’

धनंजय मुंडे यांच्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. ‘धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हतं, म्हणून मी राजकारणात आले. मी राजकारणात येणार नव्हते. तेव्हाच्या परिस्थितीत इतकं बोललं जात होतं की धनंजय निवडून येणार नाही, पंकजा मुंडेंना उभं करा. नाहीतर मी राजकारणात येण्यासाठी अजिबात इच्छुक नव्हते तेव्हा. आत्ता आले. आता धनंजय मुंडे यांनी चांगलं काम करावं अशा शुभेच्छाही मी त्यांना दिल्या. पण मला नाही वाटत आता जिल्ह्यातले लोकं समाधानी आहेत’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:49 PM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here