भारत आणि बांगलादेश यांच्यात माहिती आणि प्रसारण क्षेत्रात महत्वाचा करार

0

भारत आणि बांगलादेश यांच्यात मंगळवारी माहिती आणि प्रसारण क्षेत्रातील महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर तसेच बांगलादेशचे माहिती आणि प्रसारणमंत्री मोहम्मद एच. महमूद यावेळी उपस्थित होते. तसेच शेख मुजीबूर रेहमान यांच्या 100 व्या जयंती वर्षात प्रकाशित होणाऱ्या ‘वंगबंधू’ या त्यांच्या चरित्रपटाची सहनिर्मिती करण्याचा औपचारिक करार यावेळी झाला.
बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबूर रेहमान यांचे 100 वे जयंती वर्ष 17 मार्च 2020 ते 17 मार्च 2021 ‘मुजीब वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला आहे. त्याच प्रमाणे प्रसारभारती आणि बांगलादेश रेडिओ बेतार यांच्यात रेडिओ कार्यक्रमाच्या आदानप्रदानाचा प्रारंभ झाला. ढाका येथे मैत्री सेवेने प्रक्षेपण सुरू केले असून बांगलादेश रेडिओ बेतारचेही कोलकाता आकाशवाणीवरून प्रक्षेपण सुरू केले आहे. भारत आणि बांगलादेश यांची नैसर्गिक मैत्री असून दोन्ही देशांना समान वारसा आहे. बांगलादेश टीव्ही आणि बेतारसोबत आशय सहनिर्मितीसाठी आम्ही उत्सुक आहोत, असे त्यांनी सांगितले. ‘वंगबंधू फिल्मसिटी’ उभारण्यासाठी भारत बांगलादेशला सर्वतोपरी सहाय्य करेल, असे जावडेकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमधले संबंध नव्या उंचीवर पोहोचले असल्याचे बांगलादेशचे माहिती मंत्री मोहम्मद एच. महमूद यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here