निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या तक्रारीनंतर परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

0

नाशिकच्या परिवहन विभागातील निलंबित अधिकाऱ्यानं राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन जोरदार राजकारण पेटलं असताना आता खुद्द अनिल परब यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करुन माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहे”, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत ट्विटर अकाऊंटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “मंत्र्यांवर आरोप करुन राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मलिन करणे, या राजकीय हेतून केलेली ही तक्रार आहे”, असं ट्विट अनिल परब यांनी केलं आहे.निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर पाच अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक येथे दिलेली तक्रार पूर्णत: निराधार आणि खोटी असल्याचं परब यांनी म्हटलं आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करत असून चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:00 PM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here