कापडगाव नजीक अपघातात २ जण जखमी

0

मुंबई-गोवा महामार्गावर कापडगाव नजीक रोनीत हॉटेलच्या वळणावर कार व एस.टी बसच्या धडकेमध्ये झालेल्या अपघातामध्ये कारमधील दोघे जण जखमी झाले आहेत. तसेच वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आली आहे. या अपघातासंदर्भात पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील कापडगाव येथील रोनीत हॉटेल नजीकच्या वळणावर रत्नागिरी ते अक्कलकोट जाणारी एस.टी बस (क्रमांक एमएच २० बीएल २१२५) ही पालीच्या दिशेने येत असताना कोल्हापूरहून रत्नागिरी दीशेने जाणाऱ्या कार (क्रमांक एमएच ५० ए १६३५) ने एस.टी बसच्या उजव्या बाजूला मागील चाकानजीक समोरुन धडक देऊन अपघात केला. यामध्ये कारमधील सुंगधा परमेश्वर खोकले (२८) सर्वेश परमेश्वर खोकले (७) दोघेही रा. कोल्हापूर हे किरकोळ जखमी झाले आहेत. सदर कार परमेश्वर भीमराव खोकले हे चालवित होते. या अपघाताची खबर एस.टी बसचालक विनोद रामचंद्र माळी रा. रत्नागिरी यांनी दिली आहे. या अपघाताची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दूरक्षेत्रात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक मोहन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुमीत चिले हे करीत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here