निवृत्ती वेतनधारकांसाठी २१ जून रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन

0

रत्नागिरी : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांनी २१ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांचे कार्यालय, पणजी येथे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन अदालत आयोजित केली आहे. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत किंवा ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या निवृत्ती वेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी, ज्यांचा ३ महिन्यांच्या आत निपटारा झालेला नाही, अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतीमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतीमध्ये कायदेशीर प्रकरणे, नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार इ. आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्ती वेतनधारकांनी आपले अर्ज शिवकमार वर्मा, लेखा अधिकारी / सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी ४०३००१ यांचे कार्यालय, पणजी यांच्या नावे दि.१ जून रोजी किंवा त्यापूर्वी पाठवावेत. १ जूनच्या नंतर मिळालेल्या अर्जावर पेन्शन अदालतीमध्ये विचार करण्यात येणार नाही, असे अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग, रत्नागिरी यांनी कळविले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:56 PM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here