सातारा जिल्ह्यातील सर्व कोविड हॉस्पिटलसाठी पूर्ण वेळ ऑडिटर नेमा : उपमुख्यमंत्री अजित पवार

0

सातारा : जिल्ह्यातील प्रत्येक कोविड रुग्णालयात पूर्ण वेळ ऑडिटर नेमावेत तसेच मोठ्या गावात 30 बेडचे रुग्णालय सुरु करावे, कोविड सेवेतले कर्मचारी सोडून इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विविध जबाबदाऱ्या द्या. येत्या काही दिवसात कोरोना संसर्ग साखळी तुटली पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार अरुण लाड, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:09 PM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here