रिलायन्स फाउंडेशनतर्फे धान्य किट आणि मास्क वाटप

0

रत्नागिरी : रिलायन्स फाउंडेशनच्या मिशन अन्न सेवा आणि मिशन सुरक्षा उपक्रमांतर्गत गरजूंना धान्य किट आणि मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या काळात अडचणीत आलेले गरीब, वयोवृद्ध, निराधार, बेरोजगार, मोलमजुरी करणारे कामगार यांना रिलायन्स फाउंडेशन आणि पाटीदार युवा मंडळ सामाजिक संस्थेने धान्याचे वाटप केले. रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने गरजू व्यक्तींना मदत व्हावी, या हेतूने संपूर्ण देशभर मिशन अन्न सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या उपक्रमासाठी पाटीदार युवा मंडळ मदत करत असून ही संस्था विविध सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. संस्थेच्या मदतीने ग्रामीण आणि शहरी भागातील १५० कुटुंबांना मदत पोहोचवण्यात आली आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करण्यात महत्त्वाचे साधन असलेले मास्कचे वाटप फळे आणि पालेभाज्या विक्रेत्यांना करण्यात आले. सुमारे १००० मास्कचे वाटप पाटीदार युवा मंडळामार्फत करण्यात आले. त्यासाठी रिलायन्स फौंडेशनचे महाराष्ट्र राज्य समन्वयक दीपक केकान, रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, रत्नागिरी पाटीदार युवक मंडळाचे प्रमुख हितेंद्र पटेल ऊर्फ जितू पटेल, विजय पटेल, भावेश पटेल, मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. मिरजोळे, एमआयडीसी, नाचणे, खेडशी परिसरात गरजवंतांना वाटप करण्यात आले. नाचणे गावचे माजी सरपंच संतोष सावंत यांनी नाचणे परिसरात गरजूंना धान्य वाटपात मोलाचे सहकार्य केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:45 PM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here