महा ब्रेकिंग : 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांचे व दिव्यांगांचे उद्याचे लसीकरण होणारच !

0

◾ लसीकरणाच्या ठिकाणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत भेट देणार

उद्याच्या लसीकरणाची जबाबदारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी स्वीकारली

◾ शहरातील जेष्ठ नागरिकांना वेठीस धरणाऱ्यांची गय केली जाणार नाही : बंड्या साळवी

◾ जिल्हा परिषद आरोग्यविभाग, रत्नागिरी नगरपालिका आणि सौरभ मलूष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने होणार लसीकरण

रत्नागिरी : शहरातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगाना लसीकरण सुलभ व्हावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत एका राजकिय पदाधिकाऱ्याने तक्रारी करत अडथळे निर्माण करताच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत व नगराध्यक्ष बंड्या साळवी आक्रमक झाले. जेष्ठ नागरिकांना व दिव्यांगांना लवकरात लवकर विनासायास लस मिळालीच पाहिजे असा ठाम निर्धार करीत उद्याच्या लसीकरणाची जबाबदारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी स्वीकारली. उद्याच्या लसीकरणाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत देखील हजर राहणार आहेत. ही माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलूष्टे यांच्या कामाचे कौतुक देखील करण्यात आले. शहरातील जेष्ठ नागरिकांना वेठीस धारणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिला. आता 65 वर्षावरील ज्या 100 नागरिकांनी लसीकरणासाठी नावे नोंदवली आहेत त्यांचे लसीकरण जिल्हा परिषद आरोग्यविभाग, रत्नागिरी नगरपालिका आणि सौरभ मलूष्टे यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्वनियोजित वेळेनुसार होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली आहे. ज्या 65 वर्षावरील नागरिकांनी सौरभ मलूष्टे, हेमंत वणजु, दीपक कुवळेकर यांच्याकडे आज नावे नोंदवली आहेत त्यांचे उद्या लसीकरण होणार आहे. या नावे नोंदवलेल्या 100 जणांना लस घेण्यासाठी फोन करून वेळ व ठिकाण कळविण्यात येणार असल्याची माहिती बंड्या साळवी यांनी दिली आहे. जेष्ठ नागरिकांचे हित लक्षात घेत ना. उदय सामंत आणि नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
09:52 PM 29/May/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here