“नितीन गडकरी हे अयोग्य पक्षात असलेले योग्य व्यक्ती”

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे अनेकजण नितीन गडकरी हे पंतप्रधानपदासाठी योग्य व्यक्ती असल्याचे सोशल मीडियावरून उघडपणे सांगत आहेत. तसेच सध्याच्या काळात मोदींऐवजी गडकरींकडे पंतप्रधानपद सोपवण्यात यावे, असे म्हणणाऱ्यांचीही कमी नाही. दरम्यान, काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने आता नितीन गडकरींच्या कार्यशैलीचे उघडपणे कौतुक केले आहे. काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरींचे कौतुक केले आहे. नितीन गडकरींबाबत भाष्य करताना अशोक चव्हाण म्हणाले की, नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधांबाबत गांभीर्याने विचार करतात. मी लेखाच्या माध्यमातून तसेच ट्विटरवरून त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. मात्र याचा अर्थ मी त्यांच्या राजकीय भूमिकेचे समर्थन करतो, असा होत नाही. नितीन गडकरी हे चुकीच्या पक्षात असलेले योग्य व्यक्ती आहेत, असे खोचक कौतुकही अशोक चव्हाण यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:14 PM 31-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here