पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला : छत्रपती संभाजीराजे

0

सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी अनेकदा वेळ मागूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिली नाही, अशी जाहीर नाराजी राज्यसभेचे सदस्य छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे संभाजीराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र याबाबत आता स्वत: संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे म्हणाले की, मोदींवर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला आहे. राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून त्यांनी मला राज्यसभेत नेमलं आहे. हे सगळं असलं तरी एक खासदार म्हणून आमच्या भावना मांडणं चुकीचं नाही. त्यामुळं मराठा आरक्षणाबाबत मत सांगण्याचा माझा प्रयत्न राहील, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी मला उद्याही भेटीसाठी वेळ देऊ शकतात. पण हा वैयक्तिक भेटीचा प्रश्न नाही. समाजाचा विषय आहे. सगळ्या खासदारांना घेऊन मला त्यांना भेटायचं आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, संभाजीराजे हे तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग किल्याच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आले होते. मात्र, समुद्र खवळलेला असल्यामुळं त्यांना किल्यावर जाता आलं नाही. समुद्र शांत झाल्यानंतर ते पाहणी करतील अशी शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:40 PM 31-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here