‘कोविड-19 ची उत्पत्ती शोधा, अन्यथा…’; अमेरिकेच्या तज्ज्ञांचा इशारा

0

कोरोना व्हायरसमुळे देशभरात हाहाकार माजला आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा कोरोना कोठून आला? यावरून पुन्हा जगभरात चर्चा सुरू असून चिंताही वाढली आहे. अमेरिकेतील मीडिया कंपनी ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, कोरोना उत्पत्तीच्या अनुषंगाने अमेरिकेतील दोन तज्ज्ञांनी मोठा इशारा दिला आहे. कोविड-19 ची उत्पत्ती कुठे झाली याचा शोध लावणे गरजेचे आहे. अन्यथा कोविड-26, कोविड-32 यांचा सामना करण्यासाठी तयार राहावं लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. हा इशारा अमेरिकेच्या तत्कालीन डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त स्कॉट गॉटलीब आणि टेक्सास येथील चिल्ड्रन हॉस्पिटल फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंटचे सहसंचालक पीटर होट्स यांनी दिला आहे. स्कॉट गॉटलीब हे सध्या फायझर या औषध कंपनीच्या बोर्डचे सदस्य आहेत. स्कॉट गॉटलीब, पीटर होट्स यांनी सांगितले की, कोविड -19च्या उत्पत्ती बाबत आणि भविष्यातील महामारीचा उद्रेक रोखण्यासाठी चीन सरकारने जगाला मदत केली पाहिजे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:14 PM 31-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here