शेतकऱ्यांना मोसमी पावसाचे वेध, शेतात लगबग

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकरी राजाला मान्सूनचे वेध लागले आहेत. त्यामुळे भातशेतीच्या मान्सूनपूर्व मशागतींच्या कामांनी वेग घेतला आहे. भातबियाणे आणि खतांच्या खरेदीची लगबग वाढली आहे. कातळावरील शेतीच्या धूळफेक पेरण्यांनीही वेग घेतला आहे. त्यामुळे शेतामधील लगबग वाढली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. या पावसामध्ये सातत्य नसले, तरी आगामी मान्सूनचे संकेत त्यातून दिले जात आहेत. मान्सूनपूर्व शेतामधील कामांनी वेग घेतला आहे. शेतांची साफसफाई आणि अन्य कामे करण्यामध्ये शेतकरी सध्या गुंतल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. बियाण्यांसह खतांच्या खरेदीसाठी शेतकर्यांयकडून बाजारपेठेत गर्दी होत आहे. करोनामुळे टाळेबंदी असली, तरी शेतीशी संबंधित दुकाने उघडायला आणि अधिक वेळ सुरू ठेवायला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. जिल्ह्यात काही भागांमध्ये कातळावर शेती केली जाते. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी पेरणी केली जाते. त्याला धूळपेरण्या असेही म्हणतात. मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होताच या धूळपेरण्यांनी वेग घेतला आहे. काही भागामध्ये या पेरण्यांसाठी लागणारी नांगरणीची कामे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:59 PM 31-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here