‘शिवशाही’ची सेवा सुधारा किंवा बंदच करा

0

एस.टी. महामंडळाच्या शिवशाही बसची ऑनलाइन बुकिंग सुविधा प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. काही दिवसापासून ऑनलाइन बुकिंग करुनही ऐनवेळी बस रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे, शिवशाही बसची सुविधा सुस्थितीत कराअन्यथा शिवशाही बसची सेवा रद्द करा, असा प्रवाशांचा सूर आहे. राज्यातील प्रवाशांना वातानुकुलित आणि आरामदायी प्रवास मिळण्यासाठी शिवशाही बस सुरू करण्यात आली. मात्र, कालांतराने या बसमधील त्रुटी समोर आल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील बहुतांश प्रवासी आजही सुरक्षित आणि माफक दरात प्रवास देणारी सेवा म्हणून एसटीकडे पाहतात. मात्र, शिवशाही बसच्या समस्येमुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. अनेकदा ऑनलाइन तिकीट काढणारे प्रवासी तिकिटावर दिलेल्या वेळेनुसार नोंदणी केलेल्या ठिकाणी जाऊन थांबतात. मात्र, प्रवासी संख्या कमी असल्याने बसची फेरी अचानक रद्द करण्यात येत असल्याने ऐनवेळी प्रवाशांचे स्लीपर तिकीट असतानाही साध्या बसने प्रवास करावा लागत आहे. याकडे मात्र अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे चित्र आहे. मुंबई-पुणे मार्गावर माझा नेहमी प्रवास सुरू असतो. एस.टी. प्रशासन या मार्गावर शिवशाहीच्या जादा बस सोडत नाहीत. शनिवार व रविवार या मार्गावर गर्दी असल्याने अनेकदा ऑनलाइन तिकिटाचे आरक्षणही करतो. मात्र, कित्येकदा शिवशाहीची फेरी अचानक रद्द करुन इतर बसने प्रवास करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here