निरामय रुग्णालय कायमस्वरुपी सुरु करण्यासाठी प्रयत्न : ना. उदय सामंत

0

गुहागर : तालुक्यातील निरामय रुग्णालय कायमस्वरुपी सुरु झाले तर आगामी काळात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकतो. त्यासाठी रुग्णालयाची पाहाणी केली. ते कसे सुरू करायचे हे लक्षात घेण्यासाठी आरजीपीपीएलचे अधिकारी, शासकीय अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आहे. रविवारच्या दौऱ्यातून चांगल्या पद्धतीचे काही निर्णय होतील, असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रविवारी गुहागर तालुक्यातील रानवी येथील बंद अवस्थेत असलेल्या निरामय रुग्णालयाची पाहाणी केली.चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी निरामयच्या मालकीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्या ही जागा तांत्रिकदृष्ट्या ट्रस्टकडे आहे. ज्या हेतूसाठी एमआयडीसीने जागा वापरण्यास दिली तो हेतू साध्य होत नसल्याने एमआयडीसी ही जमीन ताब्यात घेऊ शकते. त्यासाठी एमआयडीसीकडे सदर जागेची मागणी करणारा प्रस्ताव पाठविण्याची गरज होती. तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गेला आहे. आता कायदेशीर बाबींची पूर्तता करून एमआयडीसी ही जागा स्वत:च्या ताब्यात घेईल. त्यानंतर एमआयडीसी या जागेचे हस्तांतरण जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करेल. मात्र त्यासाठी एमआयडीसी स्तरावरुन जागा ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:05 AM 01-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here