मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव : आशिष शेलार

0

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच जवळपास 9 महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. परंतु आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. कोरोनाचं कारण सांगत मुंबई महापालिका निवडणूक दोन वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. जुनी प्रभाग रचना बदलण्याचा शिवसेनाचा डाव फसल्याच्या दावाही आशिष शेलार यांनी केला. ते म्हणाले की, “जे प्रभाग आजन्म शिवसेना किंवा काँग्रेसला जिंकताच येणार नाही, अशा प्रभागांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु आहेत.” नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला. आशिष शेलार म्हणाले की, “कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा बहाणा समोर ठेवून आता जनगणना करता येणार नाही, नव्याने मतदारनोंदणी करण्यात अडचणी येऊ शकतात. यामुळे आम्हाला जास्तीचा वेळ लागेल. म्हणजेच 2021 च्या जनगणनेवर नवीन प्रभागरचना करता येऊ शकेल, म्हणून आताच्या महापालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचा, सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा आणि शिवसेनेचा निवडणुका आणखी दोन वर्षे पुढे ढकलण्याचा कुटिल प्रयत्न सुरु आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:09 PM 01-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here