धक्कादायक: चीनमध्ये H10N3 बर्ड फ्लूची एका व्यक्तीला लागण, जगभरातील पहिलंच प्रकरण

0

बीजिंग : चीनमधून उदयास आलेल्या कोरोना व्हायरसचा जग अद्यापही सामना करत आहे. त्याच आता चीनमधून चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. चीनमध्ये बर्ड फ्लूच्या H10N3 स्ट्रेनमुळे मानवी संसर्गाची पहिली घटना समोर आली आहे. नॅशलन हेल्थ कमिशनने याची पुष्टी केली. संक्रमित 41 वर्षीय व्यक्ती झेनजियांग शहरातील रहिवासी आहे. 28 मे रोजी एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूचा H10N3 स्ट्रेन या रूग्णात आढळला आहे. मात्र रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. सध्या आरोग्य अधिकाऱ्यांनी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू केला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:55 PM 01-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here