प्रहारचे पत्रकार संतोष कुळे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार जाहीर

0

बामणोली गावचे सुपुत्र आणि दै. प्रहारचे चिपळूण वार्ताहर संतोष कुळे यांची महाराष्ट्र शासनाच्या राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार योजनेअंतर्गत २०१९-२० च्या जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तालुक्यातील दुर्गम भागातून पत्रकारिता क्षेत्रात आलेल्या पत्रकार संतोष कुळे गेली १० वर्षे पत्रकारिता करीत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विकासात्मक क्षेत्रात काम करताना पत्रकारितेत सुध्दा त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. कुणबी युवा चिपळूणच्या तालुकाध्यक्षपदी काम करताना त्यांनी समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी लेखणीच्या माध्यमातून सामाजिक व महिला सबलीकरणावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबई येथे शुक्रवार १७ रोजी राज्यपालांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या शिवाय अखिल कोकण युवा संघ पुणे यांच्या वतीने ‘कोकण भूषण’ पुरस्काराने पत्रकार संतोष कुळे यांना पुणे येथे गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल दै. प्रहार कर्मचारीवर्ग तालुक्यातील प्रतिनिधी व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here