खेर्डीतील केंद्रावर जादा लसपुरवठा होणार

0

चिपळूण : खेर्डी येथील नुकत्याच सुरू झालेल्या लसीकरण केंद्रावर ग्रामस्थांचा ओघ लक्षात घेता जादा डोस मिळविण्यासाठी युवा सेनेचे तालका अधिकारी उमेश खताते यांनी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पाठपरावा सुरू केला आहे. मागील आठवड्यात खेर्डी येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लस देण्यासाठी नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर खेर्डी जि. प. गटातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लस उपलब्ध झाल्याने शहरातील लसीकरण केंद्रांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच खेर्डी परिसरातील ग्रामस्थांना वेळेवर लस मिळू लागली. लस घेण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात येत आहेत. ग्रामस्थांचा ओघ लक्षात घेता आवश्यक लसीची संख्या कमी पडू लागली आहे. परिणामी, केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना लस उपलब्ध होण्यासाठी जादा व पुरेसा लस पुरवठा व्हावा यासाठी युवा सेना तालका अधिकारी उमेश खताते यांनी खासदार राऊत यांच्याकडे पाठपरावा केला आहे. त्यानुसार परेसा लस परवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे खासदार राऊत यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:11 AM 02-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here