‘ती’ जाहिरात बोगस, पूर्णपणे फसवी; अर्ज न करण्याचे पर्यटन महामंडळ रत्नागिरी तर्फे आवाहन

0

रत्नागिरी : कोणीतरी अज्ञात व्यक्ती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बोगस लेटर हेडचा व शिक्क्याचा वापर करुन काही उमेदवारांना नोकरी बाबतची नियुक्ती पत्रे देत असल्याची बातमी दिसून आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कोकण विभाग यांचेमार्फत कोणत्याही पध्दतीची नोकर भरती जाहिरात प्रसिध्द केली नाही व कोणत्याही उमेदवारांची नियुक्ती देखील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कोकण विभागाकडून केलेली नाही. अज्ञातामार्फत गरजू उमेदवारांना गाठून अशा बोगस नियुक्ती पत्राआधारे गरजू उमेदवारांची आर्थिक व मानसिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा बोगस नियुक्तीपत्रांना व जाहिरांतीना बळी पडू नये. ज्या उमेदवारांची फसवणूक झाली असेल त्यांनी संबंधिता विरुध्द तक्रार दाखल करावी, व याबाबत काही आवश्यक माहिती हवी असल्यास प्रादेशिक कार्यालय मपविम रत्नागिरी कोकण विभाग, जिल्हधिकारी कार्यालय आवार, ए विंग, पहिला मजला, जयस्तंभ, रत्नागिरी येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र पर्यटकन विकास महामंडळ, प्रा.का. रत्नागिरी (कोकण विभाग) यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
1:14 PM 02-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here